Asia Cup 2023 | एसएससी मेन्स इमर्जिंग अशिया कप (SSC Men’s Emerging Asia Cup) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया (Pak vs India) यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत UAE आणि नेपाळचा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया हॅटट्रिक पूर्ण करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
Cows Died । धक्कादायक! विषारी वैरण खाल्ल्याने ४ गाई दगावल्या
तर दुसरीकडे पाकिस्तानलाही (Pakistan) सलग दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. या दोन्ही संघांनी (Team India) नेपाळ आणि यूएईचा पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार हे जवळपास निश्चितच आहे.
कोलंबोमधील आर प्रेमदास स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी टॉस तर सामना दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. यश धुल याच्याकडे टीम इंडिया ए चे कर्णधारपद आहे तर सॅम अयुबकडे पाकिस्तान ए चे कर्णधारपद आहे.
Rahul Gandhi | हा लढा भाजपच्या विचारसरणीविरुद्ध, राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा
टीम इंडिया
यश धुल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, मानव सुथार, निशांत सिंधू, हर्षित राणा, नितीश रेड्डी, आरएस हंगरगेकर, युवराजसिंह डोडिया, आकाश सिंग, प्रभसिमरन सिंग आणि प्रदोष पॉल.
Cricket | क्रिकेट प्रेमींसाठी समोर आली आनंददायक बातमी
टीम पाकिस्तान
सॅम अयुब (कॅप्टन), मोहम्मद हारिस (विकेटकीपर), साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कामरान गुलाम, कासिम अक्रम, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम,शाहनवाज दहनी, अर्शद इक्बाल, मेहरान मुमताज, मुबासिर खान, हसीबुल्ला खान आणि अमद खान बट.
अदानी समूहाची बदनामी करण्यासाठी हिंडनबर्गने चुकीचा रिपोर्ट दिला, गौतम अदानींचा गंभीर आरोप