Site icon e लोकहित | Marathi News

‘या’ ठिकाणाहून निघणार महाविकास आघाडीचा महामोर्चा

The grand march of the Mahavikas Aghadi will start from 'this' place

मुंबई : राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांत भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsing Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबई (Mumbai) येथे महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा; स्टेजवर झाली दगडफेक

‘महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल’ अशी घोषणा देत महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे.सकाळी ११ वाजता हा मोर्चा भायखळा या ठिकाणाहून सुरु होणार आहे. त्यानंतर जिजामाता उद्याने मोहम्मद अली रोड ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या (The Times of India) इमारतीपर्यंत हा मोर्चा असणार आहे. त्याचबरोबर ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीसमोर सभेच आयोजन देखील करण्यात आलं आहे. या मोर्चामध्ये जवळपास एक लाख कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता वर्वतली जात आहे.

महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू

या मोर्चामध्ये अनेक नेते सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊत आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले, भाई जगताप व इतर नेते. तर, राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील इत्यादी नेते या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत.

“बिनकामाचे लोकं मोर्चा काढतात”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला

Spread the love
Exit mobile version