मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात (North India) पावसाचा कहर सुरू आहे. याचा मोठा फटका दिल्लीला (Delhi) बसला आहे. काही भागात तर रुग्णांना रुग्णालयांतून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे. तर ठिकठिकाणी रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले आहेत, वाहने पाण्यात बुडाली आहेत. यमुनेच्या (Yamuna) पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून गुरुवारी वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध आणि नियमनांसाठी सूचनावली जारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
Katrina kaif Birthday | कधीच शाळेत न जाणारी कतरिना आज घेते बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन
अशातच यमुना नदीची पातळी मंगळवारपर्यंत 205.33 मीटरपर्यंत वाढणार आहे असे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद आणि गाजियाबाद या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. हवामान खात्याने पुढील पाच दिवस दिल्लीत मुसळधार ते अतिमुसळधार कोसळणार असल्याची माहिती दिली आहे.
त्याशिवाय दिल्लीत रेल्वे रुळांवर देखील पाणी साचले आहे. दिल्लीत पावसाने (Delhi Rain) ४५ वर्षांपूर्वीचा २०७.४९ मीटरचा विक्रम मोडला असून यमुनेची पाणी पातळी वाढल्यामुळे वझिराबाद, चंद्रवाल आणि ओखला येथील जल प्रक्रिया केंद्रे बंद केली आहे. पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात झाली असल्याने शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.
धक्कादायक! मुलं काढत होती आई-वडिलांचा फोटो, अचानक लाट आली अन्…
हे ही पहा