माणसाचे शरीर उत्तम असेल तर माणूस फार काळ जगतो. त्यातल्या त्यात ‘हृदय’ या मानवी शरीरातील फार महत्त्वाचा अवयव आहे. चांगल्या आरोग्यासाठी त्याला तंदरुस्त ठेवणे गरजेचे असते. मात्र सध्याच्या काळात दिवसेंदिवस हृदय विकाराच्या समस्या ( Heart Problems) वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आहारात खालील पदार्थांचा नक्की समावेश करा. ( Tips for healthy heart )
गाडीचा एक पार्ट बनवून सोलापूरच्या तरुणाला मिळाले १३ कोटी; टाटा कंपनीने घेतली दखल!
१) अख्खे दाणे – अक्खे दाणे, तपकिरी तांदूळ व क्विनोआसारखे धान्य निरोगी आरोग्यासाठी चांगले असते. हे धान्य फायबरचे चांगले स्रोत समजले जाते. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. तसेच यामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
सावधान! दुपारची झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; होतात ‘हे’ गंभीर आजार
२) जवस – तुम्ही रोज एक चमचा जवस खात असाल तर रक्तदाबाची समस्या तुमच्या जवळसुद्धा येत नाही. एका संशोधनानुसार, दररोज चार चमचे फ्लेक्स बियाणे उच्च रक्तदाब कमी करू शकतात.
३) ड्रायफ्रूट्स- ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच रक्तदाबाचा धोका कमी होतो आणि पर्यायाने हृदयाचे आरोग्य सुधारते. म्हणून हृदय निरोगी ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स खावे.
सिमकार्डबाबत समोर आली मोठी अपडेट! एका आयडीवर मिळणार फक्त ‘इतके’ सिमकार्ड; लवकरच येणार नवीन नियम
४) बीट – बीट मध्ये नायट्रेट असते. यामध्ये रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते. यामुळे रोज एक ग्लास बीटाचा ज्यूस पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या रोजच्या जीवनातील सवयींचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या व इतर गोष्टी वेळेत होणे महत्त्वाचे आहे. तसेच हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो.