
मुंबई : सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खानने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या माध्यमातुन हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. आता नुकतंच बॉलिवूडमधील त्याच्या प्रवासाला २६ ऑगस्टला ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्शवभूमीवर सलमान खानने त्याच्या नव्या चित्रपटातील लूक असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
Thackeray-Shinde: अखेर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना वर्षा बंगल्यावर भेटणार, कारण…
सलमान खान अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘भाई’ किंवा ‘भाईजान’ म्हणतात. सलमान चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम त्याच्या सोशल मीडियावरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. सलमानच्या आगामी चित्रपटाचे नाव आधी ‘कभी ईद कभी दिवाली’ असे होते. पण ते नाव बदलून चित्रपटाचे नाव आता ‘किसी का भाई.. किसी की जान’ असे करण्यात आले. चित्रपटाच्या नावातील बदल हा फक्त चाहत्यांसाठी केला आहे असे म्हंटल जातंय.
Baramati: पवारांच्या बारामतीवर भाजपच लक्ष, आत्तापासूनच सुरू केलं ‘बारामती मिशन’
२६ ऑगस्ट रोजी सलमानने ‘किसी का भाई.. किसी की जान’ चित्रपटातील त्याचा हटके लूक असलेला व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय . त्यानंतर त्याने या चित्रपटाचा ५९ सेकंदाचा टीझर व्हिडीओ शेअर केलाय. सध्या हा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये सलमानचे केस देखील वाढलेले दिसतायेत.