लग्न म्हणजे सात जन्माचं नातं (Married Life). लग्नानंतर पती-पत्नींमधलं विश्वासाचं नातं खूप महत्त्वाचं असतं. मात्र या नात्यातही काही धक्कादायक प्रकार घडले आहेत. दरम्यान अशातच अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी नववधुंकडून मोठ्या प्रमाणत फसवणुकीचे (Fraud) प्रकार घडत आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला
दरम्यान अशातच राजस्थानमध्ये (Rajsthan) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राजस्थानमध्ये एका तरुणाने तरुणीसोबत दुसरं लग्न केलं. परंतु यात धक्कादायक प्रकार हा की तरुणाने लग्न केलेल्या मुलीची लग्नाआधीच नसबंदी करण्यात आली. दरम्यान सर्वत्र या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
‘या’ पिकाची करा शेती, हमखास मिळेल बंपर उत्पन्न
नेमक प्रकरण काय आहे?
राजस्थानमध्ये एका तरुणाने आपल्या पहिल्या बायकोचा (wife) मृत्यू झाल्यानंतर वंश वाढवण्यासाठी घरच्यांच्या सल्यानुसार दुसरं लग्न केलं. लग्न झाल्यानंतर ते दोघं काही दिवस एकत्र राहिले. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर पत्नीने घरातून दागिने, रोख रक्कम घेऊन पळ काढला. त्यानंतर तरुणाने (husband) तरुणीशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
दुर्दैवी! हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर
मात्र तरुणीने घरी येण्यास नकार दिला. दरम्यान तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा पोलिसांसमोर मांडली. तसेच आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. तसेच पोलिस तरुणीची कसून चौकशी करत असून तरुणीने नसबंदी करून तरुणाला फसवल्याची माहिती समोर आली आहे.
धक्कादायक! श्रीगोंद्यामध्ये घरफोडून 56 हजार रुपयांची मुद्देमाल चोरट्यानी केली लंपास