
आपल्या आजूबाजूला प्रेम संबंधाचे अनेक वेगवेगळे प्रकार घडत असतात. काहीजण आपले प्रेम संबंध लपवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र याचे परिणाम देखील गंभीर होत असतात. सध्या देखील अशीच एक घटना समोर आली आहे. एक महिला तिचा नवरा घरी नसताना तीन दिवसापासून घरात एका युवकासोबत राहत होती. गावकऱ्यांनी तिला याबाबत विचारलं असता तेव्हा सर्वांना तिने हा माझा भाऊ आहे असं सांगितलं. मात्र ती महिला युवकासोबत खूप कमी वेळा घराच्या बाहेर यायची याच कारणातून गावकऱ्यांना तिच्यावर संशया आला. (Crime News)
यानंतर गावकऱ्यांनी तिच्या घरावर छापा मारला आणि यावेळी त्यांना भलतच दिसलं गावकरी अचानक त्या महिलेच्या घरात घुसले त्यावेळी सदर महिला त्या युवकासोबत गावकऱ्यांना नको त्या अवस्थेत सापडली. त्यानंतर गावकऱ्यांनी महिलेला कपडे घालून दिले आणि युवकाला त्याच अवस्थेत पकडलं असून खांबाला बांधून ठेवून बेदम मारहाण केली. ही घटना बिहारच्या बांका या ठिकाणी घडली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
जेव्हा गावकरी या युवकाला मारत होते त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी महिला धडपड करत होती. मारहाणीमधून ती युवकाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. महिलेचा पती दुसऱ्या ठिकाणी नोकरीला आहे. अमरपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे.
Wheat Price । गव्हाच्या किमतीत विक्रमी वाढ, रचला नवीन रेकॉर्ड; पहा किती मिळतोय भाव?
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसापासून हा युवक महिलेसोबत घरात राहत होता. मात्र अचानक नको त्या अवस्थेत या महिलेसोबत पकडलं कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी महिलेचा नवरा दिवस रात्र बाहेर काम करतोय मात्र इथे ही चुकीचे काम करत असल्याचे गावकऱ्यांच म्हणणं आहे. सध्या या महिलेच्या प्रियकराला मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती गावकऱ्यांपासून प्रियकराचा बचाव करताना देखील दिसत आहे. या घटनेची माहिती मी त्याच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.