दिल्ली : सोमवारी केंद्र सरकारकडून वरिष्ठ आयएएस अधिकारी जितेंद्र नारायण (Jitendra Narayan) यांच्यावर धडक कारवाई करुन त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निलंबित (Suspended) करण्याचं कारण म्हणजे जितेंद्र नारायण यांच्यावर एका महिलेवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे.
दिवाळीनंतर कांद्याचा भाव जाणार 50 रुपयांवर, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला बाजारभावाचा अंदाज
केंद्रीय गृहमंत्रालयाने एक निवेदन जारी करून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. दरम्यान, अंदमान आणि निकोबार पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून गुन्हेगारी प्रकरणात एफआयआर नोंदवून स्वतंत्र कारवाई केली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे जितेंद्र नारायण हे एजीएमयूटी कॅडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
Narendra Modi: यंदा शेतकऱ्यांची दिवाळी होणार धूमधडाक्यात, मोदींनी जाहीर केले दिवाळी गिफ्टही…
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवेदनानुसार, मंत्रालयाला 16 ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार पोलिसांकडून जितेंद्र नारायण आणि इतर द्वीपसमूहाचे मुख्य सचिव म्हणून काम करत होते. दरम्यान यावेळी एका 21 वर्षीय महिलेचा कथित लैंगिक छळ केल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत कडक धोरण स्वीकारले व महिलांच्या प्रतिष्ठेशी संबंधित घटनांबाबत सरकार कोणतीही गोष्ट सहन करणार नाही असं स्पष्ट केले.
दूध खरेदी दरामध्ये वाढ! ‘या’ दूध संघाने दिली दूध उत्पादकांना दिवाळी भेट
नेमक प्रकरण काय आहे?
एका 21 वर्षीय महिलेने आयएएस अधिकारी जितेंद्र नारायण यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. दरम्यानया, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जितेंद्र नारायण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान 2022च्या म्हणजे या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात तिच्यावर दोनदा सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. यावेळी महिलेने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचीही विनंती केली आहे. तसेच या महिलेने सांगितले की ती नोकरीच्या शोधात होती.
धक्कादायक घटना! दौंडमध्ये घरफोडून १० लाख ७२ हजारांसह दागिने लंपास
दरम्यान यावेळी तिची कोणीतरी हॉटेलवाल्यामार्फत आरएल ऋषीशी ओळख करून दिली होती. दरम्यान त्यानंतर ऋषी तिला आयएएस अधिकारी जितेंद्र नारायण यांच्या घरी घेऊन गेला. तेव्हा त्या महिलेला आयएएस जितेंद्र नारायण यांच्या घरी गेल्यावर पहिल्यांदा दारुची ऑफर देण्यात आली. परंतु तिने दारु पिण्यास नकार दिला. दारू पिण्यास नकार दिल्यावर नंतर तिला नोकरीचे अश्वासन देण्यात आले. दरम्यान त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.