आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीने अहमदनगर शहराच्या विकासाला गती देत आज राष्ट्रीय महामार्ग-६१ वर अहमदनगर येथे ३३१.१७ कोटी रुपये किंमतीच्या, व ३.८ किमी लांबीच्या ४-लेन एलेव्हेटेड स्ट्रक्चर असणाऱ्या उड्डाणपुलाचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) याच्या उपस्थिती हा सोहळा पार पडला.
पीएम किसान योजना तुन कोट्यवधी लोकांना वगळले; जाणून घ्या, कोणाला मिळणार नाही योजनेचा पुढचा हप्ता
यावेळी अहमदनगरचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्री सदाशिव लोखंडे, श्री सुजय विखे पाटील तसेच आमदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.
धक्कादायक! गाडी दरीत कोसळून १२ जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर
या उड्डाणपुलामुळे स्थानिक वाहतूक व राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाणार आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल व अपघातांचे प्रमाण कमी होईल. रहदारीच्या रस्त्यावरून कमी वेळात प्रवास करणे शक्य होईल. प्रवास सुरक्षित होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल, ज्यामुळे अहमदनगर शहरातील प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल.
एका चित्रपट दिग्दर्शकाने केली मोठी घोषणा! श्रद्धा वालकर हत्याकांडावर चित्रपट बनवणार..