Site icon e लोकहित | Marathi News

Abdul Sattar: स्वतंत्र भारत पक्षाने अब्दुल सत्तरांच्या मत्रिपदाचा राजीनामा घेण्याची केली मागणी, कारण…

The Independent Bharat Party demanded the resignation of Abdul Sattar's post of matri, because...

मुंबई : राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरण चांगलच चर्चेत होत.या प्रकरणात कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं देखील नाव समोर आल होत. या प्रकरणी सत्तार यांच्या मुलीच्या नावाचे प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेत आढळून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी मंत्री सत्तार याचा राजीनामा घ्यावा असे निवेदन दिले आहे.

Pankaja Munde: झी मराठीच्या ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळ्याचे निवेदन पंकजा मुंडे करणार, समोर आला नवीन लूक

नेमक प्रकरण काय आहे

१९ जानेवरी २०२० रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा गैर्यवहार प्रकार आढळला होता.हे प्रकरण राज्यभर गाजल होत.या गैरव्यवहार प्रकरणातील तीन प्रमाणपत्रे सांगली जिल्हा परिषदेकडे होती. त्यातील 2 प्रमाणपत्रे हे संबंधित व्यक्तीने ताब्यात घेतली असून तिसरे प्रमाणपत्र हे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलगी हीना फरहीन अब्दुल सत्तार शेख यांच्या नावाचे असल्याचे दिसून येत आहे. या प्रमाणपत्रावर कोणीही अद्याप हक्क सांगितला नसल्याने ते सांगली शिक्षण विभागाच्या ताब्यात आहे.

बीएड – डिएडधारकांसाठी खुशखबर! नोव्हेंबरमध्ये पुन्हा होणार टीईटी परीक्षा

मंत्री सत्तार यांच्या मुलीच्या नावाचे प्रमाणपत्र सांगलीत आलेच कसे?, ते प्रमाणपत्र खरे आहे की खोटे याबाबतीत पोलीस अधिक तपास करत आहेत असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले.तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तार यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी श्री. फराटे यांनी एका निवेदनाद्बारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Spread the love
Exit mobile version