Site icon e लोकहित | Marathi News

INDW vs AUSW Final : भारतीय महिला संघाला रौप्यपदकावर मानावे लागले समाधान

The Indian women's team had to settle for a silver medal
pc – facebook

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये इतिहास रचण्याचा डोळा ठेवून, भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुवर्णपदक गमावले आहे. अंतिम फेरीमध्ये नऊ धावांनी पराभव पत्करावा लागला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर सुवर्णपदक जिंकण्यासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तिसर्‍याच षटकात अ‍ॅलिसा हिली (७) हिला रेणुका सिंगने एलबीडब्ल्यू केले तेव्हा ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती, पण बेथ मुनी (६१) आणि कर्णधार मेग लॅनिंग (३६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा भक्कम पाया रचला गेला.

यानंतर विकेट पडत राहिल्या, पण धावांचा वेग कुठेही कमी झाला नाही. अॅशलेग गॉर्डन हिनेही उपयुक्त खेळी केली, तर रॅचेल हेन्सने साथ दिली. यासह ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 8 विकेट गमावत 161 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून स्नेह राणा आणि रेणुका सिंगने प्रत्येकी दोन, तर दीप्ती आणि राधा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याच वेळी भारतीय क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचे होते.

Spread the love
Exit mobile version