जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai highway) एक खासगी बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या घटनेत २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातामधील जखमी लोकांची भेट घेतली. आता या अपघाताबाबत (Khopoli Accident) मोठी अपडेट समोर आली आहे.
भाजप राष्ट्रवादी फोडणार? संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अपघातामधील जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांची ओळख पटली असून एकजण मिसिंग आहे. बसमधील जखमी प्रवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट दिली आहे. यावेळी हा अपघात नेमका कसा झाला याबाबत एका जखमी प्रवाशाने माहिती दिली आहे.
अजित पवार भाजपमध्ये जाणार? नाना पटोले स्पष्टच म्हणाले, “त्यांच्या मनात नेमकं…”
याबाबत माहिती देताना एक जखमी प्रवाशी म्हणाला, सकाळपासूनच ड्रायव्हर खूप भरधाव वेगाने गाडी चालवत होता. सर्व लोकांनी वारंवार सांगून देखील ड्रायव्हर ऐकायला तयार नव्हता. बसचा हा वेग पाहून प्रवाशांमध्ये खळबळ माजली होती. लहान मुले, महिला आहेत, असं सांगून देखील ड्रायव्हरने गाडी हळू चालवली नाही. त्यामुळे हा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांशी बोलताना एका प्रवाशाने ही आपबिती सांगितली आहे.
उद्धव ठाकरेंना यावेळी ‘ती’ खुर्ची मिळणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले वक्तव्य