‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि दुसरीकडे या चित्रपटाला मिळणारा मोठा प्रतिसाद यामुळे हा चित्रपट अतिशय संवेदनशील (Sensative) विषय ठरला आहे. ५ मे ला भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत १९८.४७ कोटी रुपये कमावले असून लवकरच २०० कोटींचा गल्ला देखील पूर्ण होणार आहे. चित्रपट सृष्टीतले अनेक मोठे विक्रम या चित्रपटाने मोडले असल्याचे सांगितले जात आहे. (About Ada Sharma )
दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटामधील कलाकारांची सध्या सर्वत्र तुफान चर्चा रंगत आहे. त्यातल्या त्यात तर या चित्रपटात काम करणाऱ्या अदा शर्माला जीवे मारण्याचा धमक्या आल्याने ती चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या अदाच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत. जाणून घेऊयात तिच्याबद्दल अधिक…
घरातील सोनं मोडून तरुण शेतकऱ्याने कृषी कार्यालयावर उधळले टोपलीभर पैसे; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा हिचे फक्त १० वी पर्यंत शिक्षण झाले आहे. तसेच तिने कथक या शास्त्रीय नृत्य प्रकारात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. सध्या ती आवडीने अभिनय क्षेत्रात काम करते. आजपर्यंत अदाने तेलुगू, कन्नड आणि तामिळ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. सध्या अदा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमासाठी अदाने तब्बल १ कोटी रुपयांचं मानधन घेतले आहे.
Viral Video | कैद्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण! हातात झाडू घेतला आणि…