
द केरळ स्टोरी (the Kerala story) वरून सध्या देशभरामध्ये खूप वादविवाद चालू आहेत. चित्रपटावर अनेक राज्यांनी बंदी आणली आहे. तर काही राज्यांमध्ये ते टॅक्स फ्री पाहायला मिळत आहेत. त्यातच आता द केरळ स्टोरीच्या निर्मात्यांनी ३२ हजार संख्या कुठून आणली या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. ३२ हजार आकड्यांबद्दल माहिती गोळा करून त्या संदर्भातील पुराव्यांसह आकडे सिद्ध करून दाखवण्याचा दावा विपुल शाह (Vipul Shah) यांनी केला. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज पूर्वीच वादाच्या केंद्रस्थानी होता.
“मॉडेलिंग क्षेत्रात या आणि बक्कळ पैसा कमवा”, असे सांगून पुण्यातील तरुणांबाबत घडला धक्कादायक प्रकार
चित्रपट प्रदर्शित झाला की लोकांनी त्यावर टीकास्त्र सोडले. राजकीय संघटनांकडून देखील या चित्रपटावर वर बंदी घालावी अशी मागणी होत होती. चित्रपटाची कहाणी धर्मांतर केलेल्या ३ स्त्रियांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये समाविष्ट केले जाते. एका बाजूला चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे तर दुसरीकडे या फिल्म ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणताही बॉलीवूड स्टार नसून देखील या फिल्मने १५० कोटी कमावले आहेत. या फिल्मच्या रिलीजच्या वेळी ३२ हजार मुली या अंकावरून प्रचंड गोंधळ झाला होता. फिल्मच्या टिझर आणि ट्रेलर मधून केरळमधील ३२ हजार हिंदू स्त्रियांना ISIS मध्ये जबरदस्ती पाठवण्याचा दावा करण्यात आला होता.
सोलापूरच्या शेतकऱ्याने चक्क आंब्याला दिलं शरद पवार यांचं नाव; कारणही केलं स्पष्ट…
यावरून चांगलाच वाद पेटला होता. नंतर त्या ३२ हजारच्या जागी ३ मुलींची गोष्ट असा या मध्ये बदल करण्यात आला होता. सोशल मीडियावर सगळीकडे हा बदल करण्यात आला होता. अलीकडेच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये निर्माता विपुल अमृतलाल शाह (Vipul Amritlal Shah) यांनी यावर स्टेटमेंट केले आहे. यासंदर्भात ते म्हणाले, “आम्ही खूप सार्या मुलींशी भेटलो आणि प्रत्यक्ष संवाद साधला, त्यामुळे ३२ हजार विरुद्ध ३ हा मुद्दा आमच्यासाठी नाही. आमच्या या फिल्मची गोष्ट तीन मुलींच्या जीवनावरती आधारित आहे. जे सध्या केरळमध्ये चालू आहे. त्याचा आणि या आकडेवारीचा काहीही संबंध नाही. या ३ मुलींच्या कहाणीतून आम्ही भरपूर मुलींची दुःखी कहाणी आपणासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच, पहिल्यांदाच घडलं असं; गौतमीच मार्केट डाऊन?
आमच्या चित्रपटाला खाली खेचण्याचा खूप प्रयत्न झाला आणि त्यामध्ये काही सोशल मीडियातील लोकांचा समावेश आहे. याबद्दल मला दुःख आहे. पुढे ते म्हणाले, “कितीतरी मुलींचे पूर्ण आयुष्य उध्वस्त झालेलं आहे, त्या मुलींना पाठिंबा द्यायचा तर, काही लोक त्यांना बदनाम करत आहेत. पुन्हा एकदा हा आकडा ७ हजारांवर आला आहे. लवकरात लवकर आम्ही या संदर्भातील संपूर्ण माहिती पुराव्यासह गोळा करणार आहोत. आणि या लोकांचे पितळ उघड पडणार आहोत. माझी एकच विनंती आहे या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी मदत करा.
Arpita Khan | मोठी बातमी! सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी