Site icon e लोकहित | Marathi News

The Kerala Story | ‘द केरला स्टोरी’ ची बॉक्स ऑफिसवरील कमाई ऐकून बसेल धक्का!

The Kerala Story | You will be shocked to hear the box office earnings of 'The Kerala Story'!

‘द केरला स्टोरी’ ( The Kerla Story) हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अगदी या चित्रपटाचा ट्रेलर ( Trailor) रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सुद्धा या चित्रपटावर तुफान चर्चा रंगली आहे. देशात काही ठिकाणी हा चित्रपट मोफत दाखवला जातोय तर काही ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन रोखले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banarji) यांनी या चित्रपटावर बंदी आणली. मात्र या वादाचा कसलाच परिणाम या चित्रपटाच्या कमाईवर झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तगडी कमाई करत आहे. ( Grand box office collection of the kerala story )

“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित झाल्यानंतरचा पाहिला आठवडा अजून पूर्ण सुद्धा झालेला नाही. तोपर्यंत या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अवघ्या ५ दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली आहे. विकेंड मध्ये या सिनेमाने ३५ कोटींची कमाई केली. त्यानंतर सोमवारी ११ कोटींची कमाई झाली आहे. समोर आलेल्या अहवालानुसार सिनेमाने रिलीजच्या पाचव्या ११ कोटी जमवले. दरम्यान या चित्रपटाचे कलेक्शन १०० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मेंढ्यांच्या मागे पळणारी रेश्मा झाली भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार; यशाचा संघर्ष ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरीत केले असल्याचे आणि त्यानंतर त्यांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आल्याचे सांगतो. यामुळे हा चित्रपट वादाने घेरला आहे. अगामी निवणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा राजकीय प्रोपौगंडा असल्याचे सुद्धा काही लोकांनी सांगितले आहे.

धक्कादायक घटना! लहान मुलाला खेळताना कोच पडली, मुलगा तळमळत होता मात्र डॉक्टरांनी टाके घालण्याऐवजी फेविक्विक लावलं

Spread the love
Exit mobile version