Aurangabad Crime । माजी उपसभापतीच्याच लॉजवर सुरु होता नको तो प्रकार, पोलिसांनी धाड टाकली आणि…

The kind that started at the former deputy chairman's lodge, the police raided and…

Aurangabad Crime । औरंगाबाद : वेश्याव्यवसाय (Prostitution) करणाऱ्या अनेक महिला स्वत:च्या इच्छेने या क्षेत्रात आलेल्या नसतात. अन्याय, आजुबाजूची परिस्थिती आणि सामाजिक अस्थिरतेला बळी पडून त्या या क्षेत्रात जबरदस्ती येतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यात अनेकांचे बालपण संपण्यापूर्वीच तुडवले जाते. दरम्यान, लॉज मालक आणि मॅनेजर स्वत:च्या आर्थिक फायद्याकरता महिलांकडून वेश्याव्यवसाय (Crime) करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Gold Silver Price Today । ग्राहकांनो चला खरेदीला! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने-चांदी

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वैजापूर शहरातील महाराणा चौकातील लक्ष्मी लॉजवर घडली आहे. माजी उपसभापतीच्या लॉजवर हा संपूर्ण प्रकार घडला आहे. यापूर्वीच सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने आपल्या पथकासह या लॉजवर सापळा लावला. त्यांनी एक डमी ग्राहक बनवून या लॉजवर पाठवले. (Aurangabad Crime News)

Crime News । धक्कादायक बातमी! दक्षिण कोरियाच्या महिलेचा भर रस्त्यात भारतीय नागरिकाने केला लैंगिक छळ; पाहा Video

त्यानंतर या लॉज मॅनेजरने त्या ग्राहकाला पहिल्या मजल्यावरिल रूम नं 201 मध्ये जा तुम्हाला पाहिजे ते मिळेल असे सांगितले. डमी ग्राहकाने इशारा देताच पोलिसांनी तेथे छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मालक विष्णु भिमराव जेजुरकर (वय 73 वर्षे, रा. महाराणा प्रताप चौक, वैजापुर) आणि मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे वय 43 वर्षे, रा.बेलगाव ता. वैजापूर) यांना अटक केली. या कारवाईमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Pune News | पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, धक्कादायक माहिती आली समोर

Spread the love