Vinayak Mete : विनायक मेटेंवर आज बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

The last rites of Vinayak Mete will be held in Beed today

बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात होऊन रविवारी त्यांचे निधन झाले आहे. अपघातामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. विनायक मेटेंवर (Vinayak Mete) आज दुपारी तीन वाजता राजेगाव त्यांच्या या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आज दुपारी तीन वाजता बीडमधील जालना रोडवरील उत्तम नगरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील सिध्दीविनायक पार्क येथे त्यांच्या पार्थिवावरअंत्यसंस्कार होणार आहे. अंत्य यात्रेच्यावेळी त्यांचं अंतिम दर्शन घेता येणार नाही त्यामुळे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता अंत्ययात्रेला सुरूवात होणार आहे. मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री, राज्यभरातील नेते त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अपघाती निधन –

विनायक मेटेंचा सहकारी एकनाथ कदम (Eknath Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना अपघात कसा झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीडवरून मुंबईला येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. त्यामुळे ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *