ठाकरे गटाच्या नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले गंभीर आरोप! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

The leader of the Thackeray group made serious allegations against Deputy Chief Minister Devendra Fadnavis! Inciting discussions in political circles

भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. आज देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो.या निमित्तानं विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. अशातच आता वाददेखील निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

जय श्रीरामचा गजर, बुलेट स्वारी अन् नवनीत राणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली. यामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली आहे. यामुळे आता सगळीकडे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आज रामनवमीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार!

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) माध्यमांशी बोलताना म्हणाले, भाजप आणि देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील हे सर्वजण मित्र आहे. आगामी निवडणुकांसाठी हा गेम केला जात असल्याचं खैरे यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी फडणवीसांवर देखील गंभीर आरोप केले आहे. हे सर्व भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचं प्लॅनिंग आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यात मुख्य आहेत आणि त्यांनी हे राजकारण करून महाराष्ट्राच्या जनतेस वेठीस धरलं असल्याचं खैरे यांनी यावेळी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कोरोनाचा कहर! भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *