
जंगल तोडीमुळे जंगलातील बरेच प्राणी आता मानवी वस्त्यांमध्ये अन्नाच्या शोधात येतात. पुणे शहरातील (Pune city) आंबेगाव तालुक्यामध्ये (Ambegaon District) बिबट्यांच्या फिरण्याचे प्रमाण अधिक आहे. हे बिबटे मानवी वस्त्यांकडे भटकत असतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आणि जनमाणसांमध्ये भीतीचे वातावरण असते. या परिसरातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. दरम्यान या परिसरातील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
सर्वात मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार
आंबेगावात बिबट्याचं दर्शन लोकांना सारखं घडतं. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणत्या दिवशी बिबट्या आपल्या घरी येईल या भीतीत तेथील लोक जगतात. तेथील निरगुडसर या परिसरातील रामदास वळसे पाटील यांच्या घरात बिबट्या आला होता. तो खूप वेळ व्हरांड्यात शिकार करण्यासाठी थांबला होता. परंतु त्याला तिथे काहीच मिळालं नाही. हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे त्याचा तो गंमतशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
कोल्हापूर दंगलीवरून अजित पवार यांचे गंभीर आरोप; म्हणाले, “निवडणुका समोर ठेऊन…”
रामदास पाटील यांच्या व्हरांड्यात तो बिबट्या बराच वेळ शिकारीसाठी बसला. परंतु, त्याला शिकार मिळाली नाही. मग त्या पट्ट्याने चक्क चप्पलच चोरून नेली. सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये कैद झालेला हा व्हिडिओ बघून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
मोठी बातमी! गंगा नदीत 1700 कोटींचा पूल कोसळला अन्… व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का