Site icon e लोकहित | Marathi News

ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच! ऊस तोडण्यासाठी करतायेत एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी

The looting of farmers by sugarcane workers continues! 5 to 7 thousand rupees per acre is demanded for cutting sugarcane

चालू गाळप हंगाम संपायला आला आहे. यामुळे सगळीकडेच वेगात ऊसतोड सुरू आहे. दरम्यान ऊसतोड मजूर व यंत्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करून ऊसतोड मजूर व यंत्रचालक एकरी पाच ते सहा हजार घेत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी देखील ऊस तुटला जाईल की नाही? या भीतीपोटी पैसे देत आहेत.

हनी सिंगने फक्त गाडीच्या नंबरसाठी खर्च केले होते ‘इतके’ लाख रुपये; आकडा वाचून व्हाल थक्क

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहीला होता. यामुळे यंदाच्या हंगामात ऊस ( Sugarcan) वेळेत तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. राज्यातील बहुतेक कारखान्यांची अजून आडसाली ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे पूर्व व सुरू हंगामातील ( Sugarcan Season) उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. या परिस्थितीत आपला ऊस शेतात पडून राहू नये. ही चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

हनी सिंगने फक्त गाडीच्या नंबरसाठी खर्च केले होते ‘इतके’ लाख रुपये; आकडा वाचून व्हाल थक्क

शेतकऱ्याने उसाची नोंदणी करूनदेखील कारखान्याचे चिटबॉय सोडून मुकादम स्वतःच उसाचे फड ठरवत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मुकादम एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वाहनासाठी 300 ते 500 रुपयांचा दर देऊन देखील ड्रायव्हरला जेवणाचा डबा द्यावा लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस टोळीकडून लूट सुरूच आहे. या सर्व प्रकारामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई कडून धमकी; “त्या प्रकरणी माफी मागावी अन्यथा…”

मार्च महिन्याच्या अगोदर ऊस गेल्यावर पीककर्ज नवेजुने करण्यास मदत होते. त्यामुळे मार्च महिन्याच्या अगोदर ऊस तुटून बिले जमा व्हावी याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. मात्र ऊसच न तुटल्याने सध्या शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबबावी आणि लूटमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी ऊस उत्पादकत शेतकरी करत आहेत.

नेमकी काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या याबद्दल सविस्तर

Spread the love
Exit mobile version