Site icon e लोकहित | Marathi News

कुत्र्याच्या एका चुकीमुळे मालकाचे नुकसान! संपूर्ण घर जळून खाक

The loss of the owner due to one mistake of the dog! Burn down the whole house

‘नजर हटी दुर्घटना घटी’ असं म्हणतात तेच खरं. कारण, मालकाचे लक्ष नसताना घर जाळून एका कुत्र्याने नुकताच पराक्रम केला आहे. ब्रिटनमधील एका कुत्र्याने मालकाच्या नकळत घरात हेअर ड्रायर ( Hair Dryer) लावला आणि त्यामुळे घराला आग लागली. यानंतर घरात सगळीकडे धूरच धूर झाला. ही आग विझविण्यासाठी मालकाला चक्क अग्निशमन दलाला घरी बोलवावे लागले.

ऑपरेशन करताना डॉक्टर हिरवा पोशाखच का घालतात? वाचा याबद्दल सविस्तर माहिती

त्याच झालं असं की, शनिवारी ( दि.24) संध्याकाळी घरात भरपूर धूर दिसल्यानंतर या घराच्या मालकाने एसेक्स फायर सर्व्हिसला तातडीने बोलावले. यावेळी त्यांनी आग विझवण्यासाचे काम केले. आग लागलेल्या घरात संध्याकाळी एक महिला परतली तेव्हा, तिला घर अगदी धुराने भरलेलं दिसले आणि सोबतच त्यांचा कुत्रा समोरच्या दरवाज्याबाहेर बसलेला दिसला. अशी माहिती एक्सेस फायर सर्व्हिसने दिली आहे.

मोठी बातमी! पॅराशूटचा बेल्ट निसटून युवकाचा मृत्यु

दरम्यान या अग्निशमन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की घर मालकाचा पाळीव कुत्रा ( Dog) पलंगावर उड्या मारत होता. यावेळी अनावधानाने पलंगाच्या वरच्या बाजूला असलेले हेअर ड्रायर चालू झाले. यामुळे पलंगाला आग ( Fire) लागली. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी विनंती केली आहे की, “अशा दुर्घटना टाळण्यासाठी स्ट्रेटनर किंवा हेअर ड्रायर यांसारख्या गोष्टी अनप्लग करून ठेवाव्यात”.

पडळकरांचा मोठा खुलासा! बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी

Spread the love
Exit mobile version