
औरंगाबाद: “मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा हिंदू मुस्लिम असा नव्हता” असे प्रतिपादन अनिल पहाडे यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्रामदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एम जी एम परिसरातील आर्यभट्ट हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.
हैदराबाद अत्यंत समृध्द संस्थान होते. निजामाच्या राज्यात जमीनदार लोक खुश होते. कारण त्यांना जनतेसोबत वाटेल तसे वागण्याची मुभा होती. रझाकारांनी अतोनात अत्याचार केला हे जरी खरे असले तरी हा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. हा स्वातंत्र्यलढा भारतीय स्वातंत्र्यलढ्यापेक्षाही अवघड होता हे इतिहासकारांना कळलंच नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामातील माणिकचंद पहाडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ते अहिंसावादी, गांधीवादी विचारांचे होते. त्यांनी कधीच स्पृश्य अस्पृश्यता मानली नाही. 1930 पासून त्यांनी गावोगावी जाऊन निजामाच्या जुलमी राजवटीबद्दल जनजागृती केली. लोकांना संघटित केले. वल्लभ भाई पटेल आणि बाबासाहेबांचे माणिकचंद पहाडे वरती प्रचंड प्रेम होते.
तत्कालीन निजाम आणि पोलीस कामगारांचा मोर्चा दाबून टाकायचे. तेव्हा वकिलीचे शिक्षण घेतलेल्या माणिकचंद पहाडे यांनी 1938 ते 48 बिडी कामगार आणि मांग कामगारांचे नेतृत्व केलं. कष्टकरी कामगारांसाठी पगारवाढ आणि इतर मागण्या मान्य करून घेतल्या. त्यावेळेस बॉम्बे क्रॉनिकल च्या पत्रकारांनी सुध्दा माणिकचंद पहाडे यांचे कर्तृत्व ओळखले होते. मात्र 1930 पासून ज्यांचं स्वातंत्र्यलढ्यात योगदान होतं त्यांच्याकडे इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं. त्यांच्या कामाची नोंद कोणीच घेतली नाही. मात्र नको त्या वावड्या उडवल्या. असे अनिल पहाडे म्हणाले.
Raju Shetty: पशुपालक शेतकऱ्यांनी येत्या १० दिवसात जनावरांचा विमा उतरावा; राजू शेट्टींची मागणी
अत्याचाराचा पर्व कासिम रिझवी पासून सुरू झालं. तो लातूरचा होता त्याला रजाकार म्हणायचे. त्याचा अर्थ स्वयंसेवक. निजामाच्या काळात श्रीमंत लोकांना जास्त त्रास नव्हता मात्र गरिबांना त्याचा त्रास सहन करावा लागला. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी माणिकचंद पहाडे यांनी त्याग केला मात्र त्याचे श्रेय दुसरेच घेऊन गेले. आपण इतिहास वाचला पाहिजे सांगा वांगीचा इतिहास खरा नसतो गांधीजींच्या शिकवणीचा अभ्यास केला पाहिजे. तीच आपल्याला पूर्ण उरणार आहे असे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले.
यावेळी श्रीराम जाधव यांनी ‘संविधान बचाव देश बचाव’ अशा पत्रिका सभागृहात वाटून , “हर घर तिरंगा टिकवण्यासाठी हर घर संविधान असायला हवं” असे आवाहन केले. आपण नव्या गुलामगिरीकडे वाटचाल करत आहोत हे समजून घेतलं पाहिजे. ज्याच्या त्याच्या सोयीने इतिहास लिहून आपल्यापर्यंत चुकीचा इतिहास पोहचवला जातो आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असे जाधव म्हणाले.
यावेळी , विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू विलास सपकाळ, प्रतापराव बोराडे, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, श्रीराम जाधव, प्राप्ती देशमुख या मान्यवरांसह विद्यापीठांतील विदयार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
-ज्ञानेश्वर ताले