Site icon e लोकहित | Marathi News

कांद्याचा बाजारभाव कोलमडला, तरीही राज्यात कंद्याची लागवड मोठ्या प्रमाणात

The market price of onion collapsed, yet onion cultivation in the state is large

मुंबई : शेतकरी शेतात अनेक पिके घेत असतो. दरम्यान जर या पिकाला चांगला बाजारभाव (market price) मिळाला तर शेतकऱ्याला नफा होतो. जर पिकाला कमी बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्याला (Farmers) तोटा होतो. असच आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला (Onion) सध्या कसलाच बाजारभाव नाही. यात आणखी भर पडली ती पावसाची पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. कांदा खराब होऊनही खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. यामुळे आता या नवीन कांद्याला तरी बाजार मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Raj Thackeray: “…महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान सुमारे 13 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड फक्त जळगावच्या खानदेशात झाली आहे. म्हणून आता हा कांदा बाजारात आल्यावर अजूनच दर कोसळतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील खान्देश कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. येणाऱ्या सणासुदीत भावात सुधारणा होण्याची आशा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील कांदा हे नगदी पीक असून, त्याचे भाव रातोरात बदलतात, यामुळे आता कांद्याचे दर कधी बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खुशखबर! आता फक्त 750 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर ; आजच करा बुकिंग

कांद्याचे भाव घसरल्याने महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने कष्ट तर करावेच लागत आहे. यावर्षी बियाणांचे भाव 1000, 1200 ते 2000 रुपये प्रतिकिलो होते. महागडे बियाणे आणि लागवडीचा खर्च वाढला असून आता औषधे देखील महागली आहेत. सध्या सरासरी 1 ते 8 रुपये किलोपर्यंतच भाव मिळत आहे. यामुळे शेती परवडत नाही.

शेतकऱ्यांनो सावधान! लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, आख्खी पिकेच करावी लागतेय नष्ट

Spread the love
Exit mobile version