लग्न घटिका समीप आली असताना मुली न सांगता निघून गेल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. पण भाईंदर मध्ये एका लग्न समारंभात अजबच घटना घडली आहे. लग्नाची घटिका समीप आली होती, पाहुणे मंडळीची लगबग चालू होती. वरदेव वधूच्या आगमनाकडे डोळे लावून बसला होता. वधू मंडपात प्रवेश करण्यासाठी लगबगीने बाहेर पडली. वधू लिफ्टमधून येत होती अन् अचानकच ती लिफ्ट बंद झाली. वधू तिकडे अडकली अन् इकडं सगळ्यांचा जीव मुठीत घेऊन बसण्याची वेळ आली.
Marriage | इथं एकीचेच असतात वांदे! पण ‘हा’ गडी संभाळतो ९ बायका
वधू लिफ्टमध्ये अडकल्यामुळे वरासह सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. वधूला लिस्टमधून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले,पण यश काही आलं नाही. वधूचाही लिफ्टच्याआत घामाघुन झाला. अखेर अग्निशमन दल बोलवल्यानंतर तिथं दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत 20 मिनिटानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या वधूला बाहेर काढण्यात यश मिळवले. रात्री 8 च्या सुमारास हे बचाव कार्य यशस्वी झाले. त्यानंतर वधू आणि वराचा लग्नबंधन सोहळा सुखरूप पार पडला. सव्वा आठच्या सुमारास भाईंदरमध्ये सोमवारी ही घटना घडली होती.
Crime | १६ वर्षीय मुलीची निर्दयीपणे हत्या; ९० सेकंदात केला खेळ खल्लास
भाईंदर येथील विनायक नगरमधील एका सभागृहात हा लग्न सोहळा होता. लग्नाचा मुहूर्त 9 चा होता,स र्व तयारी झाली होती. वधू देखील सर्व वेशभूषा करून आपल्या दोन बहिणींसह तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर मंडपात येण्यासाठी लिफ्टमधून येत होती. तोच हा प्रकार घडला. वधू ज्या लिफ्टमधून येत होती ती लिफ्ट अचानकच बंद पडली. पण ही कोणालाही खबर नव्हती. सर्वजण वधूचीच वाट बघत बसले होते.
वधू लिफ्टमध्ये अडकली याचं टेन्शन वेगळं आणि इकडे लग्नाचा मुहूर्त निघून चालला होता याचे टेन्शन वेगळंच होतं. अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे सर्वांची धांदल उडाली होती. लग्नाचा मुहूर्त चुकेल की काय अशी भीती लग्न मंडपात सर्वत्र पसरली होती. वधूच्या आणि वराच्या कुटुंबाचा जीव टांगणीला लागला होता. सर्वत्र धावपळ चालू होती. याची माहिती अग्निशमनदलापर्यंत पोहोताच ते घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. 20 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर अखेर वधू लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढण्यात आली. अडकलेल्या बाकी महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले.