लग्नानंतर नवरा-नवरी ( Groom & Bride) आपल्या सुंदर भविष्याची स्वप्नं पाहतात. एकमेकांशी गप्पा-गोष्टी करून, एकमेकांना समजून घेऊन त्यांच्यातील नाते बहरत जाते. दरम्यान जुनागढ ( Junagadh) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर पती आपल्या जवळ आला नाही. तसेच पतीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले नाहीत. म्हणून, नवविवाहितेने पोलिसांत तक्रार केली आहे. लग्न तर झालं मात्र शारीरिक संबंध ठेवण्यामध्ये आपल्या पतीला जराही रस नसल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
‘म्हणून कर्नाटकने भाजपला नाकारले’; विधानसभा निवडणूकीचा निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
या पार्श्वभूमीवर महिलेच्या पतीविरुद्ध पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ही महिला २३ वर्षाची असून फेब्रुवारी २०२२ मध्ये तिचा विवाह झाला होता. पोरबंदर मध्ये अगदी थाटामाटात या महिलेचा विवाह सोहळा पार पडला होता. मात्र लग्नाला काही आठवडे पूर्ण होताच त्या महिलेच्या लक्षात आले की, आपल्या पतीला शारीरिक संबंध ठेवण्यात रस नाही.
जेव्हा जेव्हा या महिलेने आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा तो तिच्यापासून दूर पळाला. आमचे लग्न झाले मात्र त्याने मला पत्नीचा अधिकार दिला नाही. अशी तक्रार या महिलेने केली आहे. याबाबत सासरच्या लोकांना माहीती दिली असता, त्यांनी तिलाच गप्प केले. तसेच घरच्यांना ही गोष्ट सांगितल्याचे जेव्हा नवऱ्याच्या लक्षात आले, तेव्हा नवऱ्याचे जीवे मारण्याची धमकी दिली. असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे.
शाळेतील शिपाई काकांनी लावला मुलीच्या प्रायव्हेट पार्टला हात अन् घरी आल्यावर मुलीने आईला…