Site icon e लोकहित | Marathi News

शेतकरी कुटुंबातील मुलीची कमाल! अभ्यास सांभाळत करते 20 एकर शेती; कमावते मोठे आर्थिक उत्पन्न

The maximum of a daughter of a farmer family! 20 acres of agriculture while studying; Earns huge financial income

शेती म्हणजे ‘कष्ट आणि संयमाचे समीकरण’! यामुळे आजचे तरुण शेतीकडे पाठ वळवताना दिसून येत आहेत. दरम्यान दुसरीकडे काही उच्चशिक्षित तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना पहायला मिळत आहेत. यामध्ये मुली देखील मागे नाहीत. संगमनेर तालुक्यातील एका मुलीने तर चक्क शेती सांभाळत स्वतःचा दूध व्यवसाय ( Dairy Farming) सुरू केला आहे. यातून तिने मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळवले आहे.

शेताच्या बांधावर जाऊन रोहित पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या!

संगमनेर ( Sangamner) तालुक्यातील अलकापूर येथील वंदना शेळके या मुलीचे नाव आहे. वंदना ही शेतकरी कुटुंबातील कन्या आहे. तिने आपल्या घरच्या सर्व शेतीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. सोबतीला तिची दहावीत असणारी बहीण देखील आहे. तिचे नाव ऋतुजा असून या दोघी बहिणी मिळून शेतात कष्ट करतात. दरम्यान वंदना सध्या बीफार्मसी ( B Farma) करत आहे, तर ऋतुजा दहावीला आहे.

शेताच्या बांधावर जाऊन रोहित पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या!

वंदना स्वतःच्या शेतात ट्रॅक्टर चालवून नांगरणी व वखरणी करणे, फळझाडांवर फवारणी करणे यांसारखी कामे करते. वंदनाच्या घरी एकूण 30 एकर शेती असून 20 एकर बागायती आहे. यामध्ये डाळिंब, हरभरा, कांदे, यांसारखी पिके घेतली जातात. एकीकडे वंदनाच्या वयातील मुली घरात एखादे दुसरे काम करतात.

कमी मतदानावरुन संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुणेकर घरी बसतील…”

मात्र, वंदना सकाळी पहाटे लवकर उठून स्वतःचे आवरून गायींचे दूध काढते. दूध काढल्यानंतर ती स्वतःच ते दूध स्कूटीवरून डेअरीवर घालायला जाते. यानंतर गायींसाठी पेंड व खाद्याची व्यवस्था करून ती कॉलेजमध्ये होते. घरी परत आल्यानंतर गुरांची देखभाल व शेतातील कामे! यातून मिळालेल्या वेळेत ती अभ्यास देखील करते.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरूणी थेट लंडनहून पुण्यात!

आज शेतात काम करण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतातील सगळी कामे शेतकऱ्याला करावी लागतात. तसेच शेतकऱ्याच्या मुलींनी शेती केली पाहिजे. शेतकरी मुलगा नको म्हणणाऱ्या मुलींनी सुद्धा शेती केली पाहिजे. असे मत वंदनाने व्यक्त केले आहे. वंदना व ऋतुजाच्या आईवडिलांना आपल्या मुलींचा फार अभिमान वाटतो.

मोठी बातमी! मतदानावेळी भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

Spread the love
Exit mobile version