लातूरमधील सोनखेड भागात पाच दिवसापासून माकडाने (Monkey) दहशद निर्माण केली होती. या माकडाने गावातील जवळपास ५० पेक्षा जास्त लोकांना जखमी केले होते. यामुळे तेथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. पण आता याबाबत एक दिलासदायक बातमी समोर आली आहे. हे माकड जेरबंद झाले आहे.
छोटा पॅकेट बडा धमाका! मोठ्यांनाही न जमणारे भजन ‘ही’ मुलगी न चुकता म्हणून दाखवते; एकदा बघाच..
मागच्या चार पाच दिवसापासून ५० लोकांना जखमी करणाऱ्या या माकडास वन विभागाच्या औरंगाबाद (Forest Department Aurangabad) आणि लातूर (Latur) येथील पथकाने जेरबंद केलं आहे.
स्वप्निल जोशी- शिल्पा तुळसकरचा बेडरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! पाहा VIDEO
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावामध्ये अनेक माकडांच्या टोळ्या आहेत. पण आतापर्यंत यांनी फक्त शेतीच नुकसान केलं आहे. मात्र यावेळी तर एक माकड लोकांवर हल्ला करत आहे. माकडाच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ५० हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.