Jarange Patil । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जहरी टीका केली. यामुळे जरांगे पाटील यांना सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी होणार आहे. त्याचबरोबर मला १०० टक्के अटक करण्यात येणार आहे, असा खळबळजनक दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
जेव्हापासून मुंबई या ठिकाणी मोर्चा गेला आहे तेव्हापासून ट्रॅप रचण्याचे काम सुरू आहे. आंदोलन शांततेत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आम्ही ते आंदोलन देखील शांततेत केले मग तरीदेखील आमच्यावर गुन्हे का दाखल केले? मला १०० टक्के अटक करणार आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले आहेत.
Praful Patel । ब्रेकिंग! अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ” सध्या मला बर वाटत नसून मी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. मी चांगला बरा झालो की पुन्हा दौरा सुरू करणार आहे. संपूर्ण राज्यभर दौरा कारणार आहे. अशी देखील माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.