Crime News । आईच्या नात्याला काळिमा! घेतला पोटच्याच लेकरांचा जीव, कारण वाचून बसेल धक्का

Crime News

Crime News । रायगड : मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. पोलिसांसमोर देखील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आव्हान बनले आहे. शुल्लक गोष्टींमुळे गुन्हे होत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरासाठी आईने टोवॅलने तोंड दाबून पोटच्या 2 मुलांना मारलं आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला

याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. दिवसांपूर्वी रायगडमध्ये 5 आणि 3 वर्षांच्या मुलांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचा तपास सुरू केला असता त्यांच्या समोर धक्कादायक माहिती आली. मुलांच्या आईला तिच्या प्रियकरासोबत पळून जायचं होतं. पण, पण तिला तिची मुलं अडथळा ठरत होती.

Ahmednagar News। हृदयद्रावक! मांजरीला वाचवण्याच्या नादात ५ जणांचा शोष खड्ड्यात बुडून मृत्यू

त्यामुळे आईने मुलांचे टॉवेलने तोंड आणि नाक दाबले, त्यामुळे दोन्ही निष्पाप मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. पती सदानंदशी लग्न होण्यापूर्वी तिचे प्रियकर साईनाथशी संबंध होते. विशेष म्हणजे लग्नानंतरही ती प्रियकराच्या संपर्कात होती. तिच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. या घटनेमुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Pune Crime । २ मुलींसोबत जेवण करून मुलगा बाहेर आला अन् अज्ञातांनी केला हल्ला; पुण्यातील विद्यापीठात धक्कादायक प्रकार

Spread the love