काँग्रसचे दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला काल कळमनुरी या ठिकाणी करण्यात आला होता. त्यांच्या सभोवताली जास्त जमाव असल्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. मात्र आता अटक केलेल्या आरोपीच्या आईवडिलांनी प्रज्ञा सातव यांच्याकडे माफी मागितली आहे.
आता ‘काठी’ ऐवजी पिस्तूल, कोयता गँगचा बंदोबस्त होणार; पोलीस प्रशासनाने उचलली ठोस पाऊले
आरोपीचं नाव महेंद्र असं आहे. आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई चालू आहे.आता या प्रकारानंतर आरोपीचे आईवडील प्रज्ञा सातव यांच्या घरी गेले आहेत. त्यावेळी आरोपीचे आईवडील म्हणाले, “आमचा मुलगा रोज बकरी वळतो त्याने नशेत हे केलं असेल मात्र त्याने जे केलं ते खूप चुकीचं केलं. एवढ्या वेळेस त्याला माफ करा.”असं म्हणत आरोपीच्या आईने टाहो फोडला.
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जीवितहानी; मृत्यूची संख्या नऊ हजारांवर
दरम्यान, या हल्ल्यानंतर स्वतः प्रज्ञा सातव यांनी देखील याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मी महिला लोकप्रतिनिधी असल्याने मला घाबरवून घरी बसवण्याचा प्रयत्न होता. मात्र मी घाबरणार नाही”. या शब्दामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.