
एखादे मुलं चुकले की समाज मुलाच्या पालकांवर व त्यांच्या संस्कारांवर बोट ठेवतो. यामुळे प्रत्येक आईवडील लहानपणापासूनच आपल्या मुलांना चांगले वळण लावायचा प्रयत्न करतात. यासाठी वेळप्रसंगी कठोर होऊन स्वतःच्या मनाविरुद्ध भयंकर शिक्षा देखील देतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video) होतोय. या व्हिडिओमध्ये एक आई रागात चक्क मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकताना पहायला मिळत आहे. तेलंगणा येथील नालगोंडा जिल्ह्यातील ही घटना आहे.
धक्कादायक! श्रीगोंद्यात तरुणावर गोळीबार…
त्याच झालं असं की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 15 वर्षाच्या मुलाला धूम्रपानाचे ( Smoking ) व्यसन आहे. ही गोष्ट या मुलाच्या आईच्या लक्षात येताच तिने मुलाला एका खांबाला बांधून ठेवले. यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर चोळली. डोळ्यात मिरची पावडर गेल्याने हा मुलगा भयंकर ओरडतात पहायला मिळत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून पाहणारे देखील आश्चर्यचकित झाले आहेत. आपल्याच पोटच्या मुलाला आई इतकी कठोर शिक्षा देऊ शकते. हे पाहून लोक थक्क झाले आहेत.
Son-Mom kalesh (Mother Rubbed Red Chilli In the Eyes of Son for Smoking)pic.twitter.com/HI0CmK28lq
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 2, 2022
धक्कादायक! श्रीगोंद्यात तरुणावर गोळीबार…
आईने मुलाला दिलेल्या या भयंकर शिक्षेचा ( Dangerous punishment) व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी अनेक पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी कठोर शिक्षा देणाऱ्या आईचे समर्थन केले आहे. तर काही लोकांनी आईच्या या कृत्याला विरोध दर्शविला आहे. याशिवाय ‘कोरोना काळात मुले भरपूर दिवस घरात होती. त्यामुळे ती व्यसनांच्या आहारी गेली आहेत.’ अशाही आशयाच्या प्रतिक्रिया लोकांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
जुळ्या बहिणींसोबत लग्न करणे पडले महागात; नवरदेवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल