
Maratha reservation । नांदेड : दिवसेंदिवस मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आरक्षण (Reservation protest) मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. परंतु या आरक्षणाला गालबोट लागले आहे. आरक्षण मिळत नसल्याने एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
ही घटना नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातील आहे. सुदर्शन देवराये या तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. तो आंदोलनातही सहभागी झाला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून त्यानेटोकाचा निर्णय घेतला असावा दावा स्थानिक नागरिक करत आहेत. या घटनेमुळे कामारी गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आंदोलन आणखी तापू शकते.
दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा तरुण मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी कामारी गावात 14 सप्टेंबरपासून साखळी उपोषणात सहभागी झाला होता. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी अजूनही आंदोलन आणि उपोषण सुरुच आहे.
Breaking News । ठाकरेंना धनुष्यबाण परत मिळणार? आज होणार महत्त्वाची सुनावणी