‘भोला’ हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू हे दोघे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला मात्र या चित्रपटाला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग करता आली नाही.
ब्रेकिंग! इंदूरमधील त्या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू
काल रामनवीनिमित्त जवळपास सर्वांना सुट्टी होती मात्र सुट्टी असून देखील हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची अजिबात गर्दी नव्हती. सिनेमागृहांमध्ये मॉर्निंग शोच्या तर ९० टक्के सीट्स रिकाम्या होत्या. त्यामुळे ‘भोला’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. या चित्रपटाला पाहिजे तेवढी कमाई करता आली नाही. सुट्टी असून देखील या चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाले या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील कमीच झाले आहे.
कांद्याला अनुदान मिळण्याचा आज शेवटचा दिवस; पाहा काय आहेत कांद्याचे दर?
हा चित्रपट तमिळ सिनेमा ‘कैथी’चा रिमेक असून अभिनेता अजय देवगणनेच दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दृश्यांची भव्यता दिसून आली होती. मात्र रीलिजनंतर सिनेमाच्या स्क्रिनप्लेचे विशेष कौतुक होताना दिसले नाही. मात्र पहिल्या दिवशी ओपनिंग चांगली झाली नसली तरी नंतर शनिवार-रविवारी सिनेमाची कमाई वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात भोला किती कमाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
धक्कादायक! विधानसभेत पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडला गेला भाजपचा आमदार; व्हिडीओ व्हायरल