Crime News । पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण (Crime in Pune) झपाट्याने वाढत चालले आहे. पोलिसांसमोर देखील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आव्हान बनले आहे. शुल्लक गोष्टींमुळे गुन्हे (Crime) होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात सध्या एका तरुणीसोबत भयानक प्रकार घडला आहे. (Latest marathi news)
Gudi Padwa 2024 । गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर वर्षभर तुम्हालाही…
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या वोघोली येथे भाग्यश्री सूर्यकांत सुडे ही तरुणी इंजीनियरिंगचे शिक्षण घेत होती. तरुणीने 30 मार्च रोजी तिच्या कुटुंबासोबत संपर्क केला. पण 31 मार्चपासून तरुणीचा फोन बंद होता. दोन एप्रिलला तरुणीच्या आईच्या फोनवर तुमच्या मुलीचं अपहरण केलं असून तिच्या सुटकेसाठी नऊ लाख रुपये तातडीने द्या, असा मेसेज आला. (Pune Crime)
Supriya Sule On Ajit Pawar । सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांबद्दल मोठे वक्तव्य!
त्यानंतर, तरुणीच्याचे वडिलांनी तातडीने विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये याबाबत दिली. पोलिस तपासादरम्यान तरुणीचा खून करून आरोपींनी तिचा मृतदेह नगर जिल्ह्यातील सुपा गावाजवळ एका शेतात पुरून ठेवला होता. धक्कायदायक बाब म्हणजे आरोपी शिवम फुलावळे हा कर्जबाजारी झाला होता. त्याला तरुणीचे अपहरण केले तर पैसे मिळतील, असं वाटल्याने त्याने भाग्यश्रीला संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.