तीन दिवसांपूर्वी दौंड (Daund) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली होती. मंगळवारी ( ता.24 ) एकाच कुटुंबातील सात जणांचा भीमा नदीत मृत्यु झाल्याचे आढळले होते. हा अपघात नसून हत्या आहे. हे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान याबाबत आणखी तपास सुरू असून रोज नवीन माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
बारामतीमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकारी व कार्यकत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश
या लोकांची कौटुंबिक वादातून हत्या केली आहे, असे देखील पोलिसांनी स्पष्ट केले होते. यानंतर सातही लोकांचे मृतदेह यवतमध्ये पुरण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांचा सखोल तपास सुरु ठेवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यासाठी विशेष पथक देखील स्थापन करण्यात आले होते. मात्र अधिक तपासासाठी पोलिसांनी तीन जणांचे पूरलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढले आहेत.
आता चित्रपटातही गाणार अमृता फडणवीस, नवीन गाणं झालं रिलीज! पाहा VIDEO
या तीन मृतदेहाचे शवविच्छेदन काल यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत कुठलाही अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. या प्रकरणी पाच जणांना आरोपी म्हणून अटकही करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून (Family Problems) हे हत्याकांड झाले असल्याचे समोर येत आहे. हत्या करणारे आणि मृत झालेले हे एकमेकांचे भाऊ- बहीण असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. शवविच्छेदन करण्यासाठी पुरलेले मृतदेह बाहेर काढल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
ब्रेकिंग! अचानक तब्बेत बिघडल्याने अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल