शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या पॉवर मध्ये वाढ झाली आहे. दरम्यान शिंदे गटात पक्षांतर्गत बांधणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर पक्षाच्या म्हणून ज्या काही बाबी आहेत, त्यावर देखील शिंदे गटाकडून (Shinde Group) लवकरच हक्क सांगण्यात येणारं आहे.
निळू फुले यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार बायोपिकचं दिग्दर्शन
त्यामुळे जागोजागी असणाऱ्या शिवसेनेच्या शाखा कुणाकडे जाणार? आणि शिंदे गटाची पुढील रणनीती काय असणार आहे? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच्या नावे असल्यामुळे ते शिंदे गटाकडे जाणार नाही. परंतु तरी सुद्धा मुंबईतील शाखांचा प्रश्न बाकी आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितला पुढचा प्लॅन; म्हणाले, “मशाल हे चिन्हं गेलं तरी…”
मुंबईमध्ये ( Mumbai) जवळपास 227 वॉर्डमध्ये शिवसेनेच्या शाखा आहेत. तसेच इतर ठिकाणी एक किंवा दोन शाखा आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही शाखा अनधिकृत आहेत. तसेच बहुतेक शाखा शिवाई ट्रस्टच्या नावे आहेत आणि ज्या शाखा ट्रस्टच्या नावे नाहीत, त्या जुन्या शिवसैनिकांच्या नावावर आहेत.
यातला ट्विस्ट म्हणजे शिवाई ट्रस्ट मध्ये आतापर्यंत फक्त 6 सदस्य होते. मात्र यामध्ये नुकतेच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे. विरोधकांनी हा देखील हा मुद्दा उचलून धरत टीका केली आहे. दरम्यान विधानभवनातील कार्यालय शिंदे गटाकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
ब्रेकिंग! आदित्य ठाकरेंची आमदारकी जाणार?
तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाखा शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाच्या ताब्यात असल्याने त्या शिंदे गटाकडेच राहणार आहेत. पक्ष मजबूतीसाठी शिंदे गटाकडून लवकरात लवकर कार्यकारिणी बोलविण्यात येणार आहे व प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे व इतर महत्त्वाचे नेते सचिव असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एफडी करताय तर थोडं थांबा! ‘या’ आर्थिक गुंतवणुकीत सुद्धा आहेत मोठे तोटे