
Pune accident । पुणे : अपघातांचे (Accident) सत्र अजूनही सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. अनेक अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. परंतु, या अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. या अपघातात कोणाला आपला जीव गमवावा लागतो तर कोणाला कायमचे अपंगत्व येते. सध्या असाच एक भीषण अपघात पुणे जिल्ह्यात झाला आहे. (Latest Marathi News)
Sanjay Raut । “2024 पूर्वीच भाजपमध्ये पडणार फूट”, संजय राऊत यांचा मोठा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर रिक्षाचा अपघात झाला आहे. या मार्गावर खळद बोरावके मळा येथे असणाऱ्या थेट एका विहिरीमध्ये रिक्षा पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य सुरु केले. क्रेनच्या मदतीने रिक्षा बाहेर काढली. यात बसलेल्या दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. (Pune Accident News)
Shailesh Lodha । शैलेश लोढांचा निर्मात्यांबाबत खळबळजनक दावा; म्हणाले, “कलाकारांना नोकरांसारखी…”
या अपघातात तिघां जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, मृत व्यक्ती सर्व एकाच कुटुंबातील आहे. चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा विहिरीत पडली, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
NCP । शरद पवार गटाला मोठा दणका! केंद्रीय पातळीवर अजित पवार गटाची वाढली ताकद