
मागच्या काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. यांनतर राजकीय भूकंप आला. यांनतर महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. या बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू सामील झाले होते. आता यावरून एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंना चांगलंच झापलं आहे.
बच्चू कडू यांनी नुकतंच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही गद्दारी का केली? असा थेट सवाल वृद्धाने बच्चू कडू यांना विचारला आहे. त्याचबरोबर, जरा नीट वागा, राज्यघटनेच्या चौकटीत वागा, जनतेला त्रास देऊ नका, असं यावेळी आजोबा म्हणाले आहेत.
80 वर्षाच्या व्यक्तीने बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून आपण जनतेसोबत गद्दारी केली आपण गद्दार आहात असं म्हटलं pic.twitter.com/YESQaJwaC7
— kailas chaudhari 90 (@kreporter2014) February 28, 2023
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हडिओ kailas chaudhari 90 या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘त्या’ एका अहवालाने सगळा गेम बदलला; अदानी ठरले टॉप लुझर आणि एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत