Manipur । इम्फाळ : मणिपूरमधील हिंसाचार (Manipur violence) अजूनही शांत झाला नाही. धक्कादायक बाब म्हणजे काल संध्याकाळी थेट मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांचे घर संतप्त जमावाकडून पेटवण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी वेळीच या जमावावर नियंत्रण आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या जमावाने प्रचंड तोडफोड करत वाहनांना आग लावली. मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)
Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
जुलै महिन्यात बेपत्ता झालेल्या एका मुलाची आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. त्यामुळे इम्फाळमधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मंगळवारपासून ते आतापर्यंत 65 जण जखमी झाले असून थौबल जिल्ह्यातील खोंगजाममध्ये भाजपच्या कार्यालयाला आग लावली आहे. सध्या पोलिसांकडून या जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना थांबत नाहीत. त्यामुळे बिरेन सिंह यांनी 19 थाने क्षेत्राला सोडून संपूर्ण मणिपूरला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याने बिरेन सिंह यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर राज्याचे वातावरण आणखी तापले आहे.
Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून