Viral Video । मुंबई : कोणताही ऋतू असो मुंबईकरांचे (Mumbai) हाल कधीच कमी होत नाहीत. या शहरात सतत वाहतूक कोंडी (Traffic congestion) होत असते. परंतु आता त्यात भर पडलीय ती पावसाची. मुंबईत मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain in Mumbai) हजेरी लावली आहे. पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. तर या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. (Latest Marathi News)
Pune News । धक्कादायक! बंदी असताना प्रवास करणे आले अंगलट, तिघांसह कार कोसळली धरणात
दरम्यान, सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील वसई पूर्व येथील आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर काही ठिकाणी गुडघ्याइतके तर काही ठिकाणी कंबरेइतके पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागत आहे. काही वाहने तर या पाण्यामुळे बंद पडली असल्याने त्यांना धक्का देऊन बाहेर काढले जात आहे. (Mumbai Viral Video)
PM Kisan Yojna। 14 वा हप्ता जमा झाला नाही? काळजी करू नका, ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा फोन
मुंबईतील अनेक इमारतींच्या पार्किंकमध्ये तसेच घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पार्किंगमध्ये लावलेली वाहनेसुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.