ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास (Odisha Health Minister Naba Das) यांच्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गोळ्या झाडल्या होत्या. उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला. या घटनेन संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राज्याने मोठा नेता गमावल्याचे बोलले जात आहे.
मोठी बातमी! भर सभेत गोळ्या मारलेले आरोग्यमंत्री नबा दास यांचे निधन
एएसआय गोपाल दास यांनी आरोग्यमंत्र्यावर भरसभेत गोळ्या झाडल्या. ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्या पत्नी जयंती दास यांनी माध्यमांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, घटनेच्या आधी गोपालचे मुलीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. त्यांनतर काय झाले हे मला माहीत नाही. मला या घटनेची माहिती बातम्यांद्वारे समजली. घटनेच्या दिवशी गोपाल आणि माझं काहीही बोलणं झालं नाही.
दरम्यान, ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांच्यावर ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गोळ्या झाडल्या. यांनतर त्यांना लवकरात लवकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
“मित्रामुळे वडापाव खाणे सोडले”, तेजस्विनी पंडितने केला मोठा खुलासा