Maharashtra Politics । आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येही शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे (NCP) फूट पडते की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याकडून नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?
याच पार्श्वभूमीवर काल पुण्यामध्ये पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक पार पडली. परंतु, रविकांत तुपकर हे या बैठकीला गैरहजर राहिले होते. त्यामुळे समितीकडून त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी पंधरा ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होईल.
Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना मोठा झटका! वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे
दरम्यान, काल पार पडलेल्या बैठकीमध्ये राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकरांनी केलेल्या आरोपाबाबत खुलासा केला. राजू शेट्टी बोलताना म्हणाले की, “मागील काही दिवसांपासून रविकांत तुपकर नाराजी व्यक्त करत आहे. स्वाभिमानी एकसंघ राहण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. स्वाभिमानी एक कुटुंबासारखा राज्यामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे फक्त गैरसमजातून तुपकर यांच्याकडून आरोप केले जात आहेत”, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.