मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींचे पगार देखील मोठेच असतात. राष्ट्रपती ( President) हे देशातील सर्वोच्च पद आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा पगार देखील भरगच्च असतो. सध्या भारताच्या राष्ट्रपदी असणाऱ्या द्रौपदी मुर्मु ( Draupadi murmu) यांना नवीन नियमानुसार 5 लाख पगार आहे. याआधी भारताचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही दर महिन्याला पाच लाख रुपये पगार दिला जात होता. तर 13 वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना 1.5 लाख पगार होता.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मोठी मागणी
त्याच झालं असं की, सातव्या वेतन आयोगानंतर ( 7th pay commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रपतींच्या वेतनापेक्षा जास्त झाले. दरम्यान एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार राष्ट्रपतींपेक्षा अधिक असणे हे राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेसाठी चुकीचे होते. म्हणून राष्ट्रपतींच्या पगारात तब्बल 200 पटींनी वाढ करण्यात आली. यानंतर राष्ट्रपतींचा पगार ( President’s sallary) दीड लाखांवरून थेट पाच लाख प्रति महिना झाला. एवढंच नाही तर यामुळे उपराष्ट्रपती यांचा पगार देखील 3.5 लाख करण्यात आला.
शिक्षक की राक्षस! चौथीच्या विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरून दिलं खाली फेकून
महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींच्या जोडीदाराला ( पती/पत्नी ) सरकारकडून महिन्याला 30 हजार रुपये सेक्रेटेरियल मदत मिळते. तसेच राष्ट्रपती भवनात खाणे-पिणे, नोकर-चाकर या सुविधांसाठी भारत सरकार प्रत्येक वर्षी चक्क 22.5 कोटी रुपये खर्च करते. याशिवाय भारताचे राष्ट्रपती मर्सिडीज बेंझ या गाडीतून प्रवास करतात. अधिकृत भेटीसाठी त्यांना एक लांब बख्तरबंद लिमोझिन देखील दिली जाते. राष्ट्रपती व त्यांच्या कुटूंबियांना सरकारकडून आयुष्यभरासाठी आरोग्य सुविधा पुरविल्या जातात.
ब्रेकिंग: मुंबई हायकोर्टाचा गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मोठा निर्णय