
हल्ली घटस्फोटाच्या केसेस भरपूर वाढल्या आहेत. छोट्या छोट्या कारणांवरून पती-पत्नींमध्ये वाद होतात आणि ते थेट कोर्टापर्यंत जात घटस्फोटच होतात. नवरा बायकोच्या भांडणाच्या बऱ्याच घटना समोर येतात. दरम्यान चीनमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चीनमधील ही घटना सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतेय. तेथील एका महिलेने तिला घटस्फोटानंतर सेटलमेंटचे पैसे न मिळाल्यामुळे तिच्या पतीच्या लग्नात जाऊन तिने गोंधळ घातला आहे.
घटस्फोट झाल्यानंतर दोन व्यक्ती म्हणजेच पती आणि पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात. परंतु, ही केस अजबच आहे. त्या महिलेने तिच्या पतीच्या दुसऱ्या लग्नात जाऊन खूप गोंधळ घातला आहे. ही घटना चीनमधील सिचुवान प्रांतांत घडली आहे. लुओ सरनेम नावाची महिला तिच्या आधीच्या पतीच्या लग्नात पोहोचली. अन् तिने लग्नात आलेल्या वऱ्हाडाच्या हातात काही पॅम्प्लेट द्यायला सुरुवात केली. त्या महिलेने या संदर्भात सोशल मीडियावर देखील एक मेसेज लिहिला होता की, ‘मी माझ्या आधी असलेल्या पतीच्या अनैतिक नात्याला शुभेच्छा देते’. एवढेच नाही तर तिने एक मोठा बॅनर देखील लावला आणि त्यावर एक मेसेज लिहिला होता. त्यामध्ये ती म्हणाली की, कायदेशीररित्या अजूनही मी त्याची पत्नी आहे. या महिलेने असं करण्यामागचं कारण म्हणजे तिला घटस्फोटानंतरचे सेटलमेंटचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत.
दिल्लीत गँगवार! चार जणांवर गोळीबार, जखमी तरुणांची आई म्हणाली, “माझ्या…”
या महिलेचा आणि तिच्या पतीचा 2019 मध्ये घटस्फोट झाला होता. सेटलमेंटनुसार या महिलेला 1 मिलियन युवान म्हणजेच एक कोटी 15 लाख रुपये द्यायचे होते. व या महिलेकडे तिच्या मुलीची कस्टडी देखील आली होती. त्याचबरोबर या महिलेला दर महिन्याला 5 हजार युवान म्हणजेच 56 हजार रुपये देण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. शिवाय त्या महिलेचे लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीने तिचा मेडिकलचा खर्च करावा आणि तिला बिजनेस इन्शुरन्स देखील द्यावा. या महिलेच्या पतीने ही कोणतीच अट पूर्ण केली नाही. त्यानंतर ती महिला कोर्टात गेली. परंतु, तिला तिथेही न्याय मिळाला नाही. म्हणून ती थेट तिच्या पतीच्या लग्नात जात गोंधळ करत होती. परंतु सध्या तिला तीन टप्प्यांमध्ये सगळी रक्कम देण्यासाठी तिचा आधीचा पती तयार झाला आहे. त्या पतीने त्याच्या आधीच्या पत्नीला सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले आहे.
मोठी बातमी! रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर