बटाटा हा रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. या फळभाजीची गणना जगभरातील प्रमुख भाज्यांमध्ये केली जाते. सामान्य लोक बटाट्याच्या ( potato) किंमतीवर चांगलेच लक्ष ठेऊन असतात. बटाटे २०-२५ रूपये प्रति किलोच्या वर गेले की लोकांना महाग वाटतात. दरम्यान बटाट्याचा एक खास प्रकार सध्या सर्वांनाच आकर्षित करत आहे. या बटाट्यांची किंमत ऐकून तुम्हीही अगदी थक्क व्हाल.
२२ वर्षीय साताऱ्याचा ‘वीरपुत्र’ देशासाठी शहीद; पाच दिवसांपूर्वीच गावी येऊन गेला होता…
हा बटाटा शंभर नाही, दोनशे नाही तर चक्क चाळीस हजार ते पन्नास हजार प्रतिकिलो किंमतीने विकला जातो. ले बोनॉट बटाटे असे या बटाट्याचे नाव असून हा बटाटा जगातील सगळ्यात महाग बटाटा आहे. फ्रान्समधील इले दे नॉयरमाउटियर या बेटावर हा बटाटा पिकतो. हा बटाटा इतर जातींपेक्षा वेगळा बटाटा आहे. वर्षातून फक्त १० दिवस हा बटाटा उगवतो. ( Most valuable potato)
संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले, अजित पवार अमित शाहांबरोबर…”
ले बोनॉट बटाटा फक्त ५० चौरस मीटर वालुकामय जमिनीवर उगवतो. नैसर्गिक खत म्हणून याची निर्मिती केली जाते. त्यासाठी सिव्हीडचा वापर होतो. या बटाट्याची चव खारट, आंबट व नटी अंडरटोनसह वेगळी असते. या बटाट्याच्या स्किनमध्ये आजूबाजूची माती व समुद्राच्या पाण्याचे सुगंध शोषून घेण्याची क्षमता असते. हा बटाटा विविध सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या पाककृतींसाठी बनवला जातो.
‘जे भाजपामध्ये जातील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय’ शरद पवार स्पष्टच बोलले