‘या’ पिकामुळे चिकनचे वाढणार दर, कारण…

The price of chicken will increase due to this crop, because…

राज्यात यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे (Haivy rain) शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यतील कसमादे भागातील शेतकऱ्यांचे मका पीकाचे देखीलमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास हजार एकर क्षेत्राच्या पेक्षा जास्त मका पिकाचे (Maize) उत्पादन घेतले जाते. परंतु मका पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये काही मकाच्या पिकांची मुळे सडून गेली आहे.

पोलिसांना घरबांधणीसाठी मिळणार कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

तर काही ठिकाणी मक्याची वाढच खुंटून गेली आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून उत्पादन घटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मका पिकाच्या नुकसानीमुळे आता पोल्ट्री व्यवसाय (Poultry business) करणाऱ्या कंपन्यांना याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मक्याचे मोठे नुकसान झालेले असल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर होणार आहे.

बाजरीचा भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढला, जाणून घ्या दर

कारण पोल्ट्री व्यवसाय करताना कोंबडीला लागणारे खाद्य तयार करताना मक्याचा वापर केला जातो. दरम्यान अतिवृष्टी झाल्याने मक्याचे उत्पादन घटले. त्यामुळे चिकनच्या दरात वाढ होऊ शकते आणि त्यामुळे कोंबडीचे खाद्य देखील महाग होणार आहे. कोंबडीचे खाद्य महाग झाल्याने कोंबडीच्या विक्री दरात देखील फरक जाणवणार आहे. त्यामुळे चिकनचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर मक्याच्या पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी कसमादे परिसरातील शेतकरी करीत आहे.

दसऱ्याला ‘या’ गावात रामाची नाही, तर रावणाची होते पूजा; तब्बल दोनशे वर्षांपासून परंपरा चालू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *