
गाढव (Donckey) या प्राण्याला कोणी फारसे महत्व देत नाही. यामुळे बऱ्याचदा ‘गाढव’ हा शब्द एखाद्याला कमी लेखण्यासाठी वापरला जातो. मात्र असे असले तरी गाढव अनेक कामांसाठी उपयोगी देखील पडते. यामुळे जेजुरी येथे भरलेल्या पारंपरिक गाढव बाजारात (Traditional Donkey Market) गाढवांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. यामध्ये गावरान गाढवांची किंमत 35 हजारापर्यंत होती तर गुजरातहून आलेल्या काठेवाडी गाढवांचे दर 40 हजारापासून एक लाखांपर्यंत पोहोचले आहेत.
पुणे जिल्ह्यात लम्पीच्या लसींचे उत्पादन होणार; देशात सर्वप्रथम पुण्यालाच मिळाली संधी!
गेल्या तीन दिवसांपासून जेजुरी ( Jejuri) येथील बंगाली पटांगणामध्ये हा गाढवांचा बाजार भरला आहे. या बाजारात गाढवे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी आले आहेत. या बाजारात मोठया प्रमाणात गाढवांची खरेदी-विक्री केली जाते. विशेष म्हणजे या बाजारात खंडोबाच्या साक्षीने अनेक व्यवहार उधारी पद्धतीने होतात. ज्यामध्ये पुढील वर्षी पैसे देण्याचा शब्द दिला जातो. कुठल्याही प्रकारचे लिखित पुरावे न ठेवता हे व्यवहार सुरळीतपणे पार पडतात.
Amruta Fadanvis: अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज
वीट भट्टीवर वीट वाहतुक करणे किंवा दुर्गम भागात विटा, दगड, माती, खडी, मुरूम, सिमेंट पोती व इतर साहित्य वाहतुकीसाठी गाढवाचा वापर केला जातो. यामुळे या बाजारात वैदु कोल्हाटी, मदारी, कुंभार, गारुडी व इतर भटक्या विमुक्त समाजातील लोक गाढवांच्या खरेदीसाठी येतात. यावेळी गाढवांचे दात पाहून बोली लावली जाते किंवा त्यांना पळवून शारीरिक चाचणी केली जाते.