चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा असतो. काही लोकांना चहा इतका प्रिय असतो की त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. चहा प्रेमींसाठी ( Tea lovers) बाजारात खास वेगवेगळ्या प्रकारच्या चहापत्ती उपलब्ध असतात. कडक चहा, मसाला चहा, इलायची चहा असे चहाचे अनेक प्रकार आहेत. यातील काही स्वस्त असतात तर काही महाग. पण, कोटींच्या घरात किंमत असणाऱ्या चहापत्तीचा चहा तुम्ही कधी पिलाय का ?
दुधाच्या दरात पुन्हा वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर
जगातील सर्वात महाग चहापत्ती ( tea leaves) म्हणून ही चहापत्ती प्रसिद्ध आहे. या चहापत्तीच्या एक किलो पॅकेटची किंमत नऊ कोटी रुपये इतकी आहे. दा-हॉग पाओ टी असे या चहापत्तीचे नाव आहे. ही चहापत्ती चीनमधील फुजियानच्या वुईसान भागात मिळते. या भागाव्यतिरिक्त जगभरात कुठेच ही चहापत्ती उपलब्ध होत नाही.
बिग ब्रेकिंग! पुण्यातील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात! कंटेनरने २६ गाडयांना उडविले
अतिशय दुर्मिळ अशा या चहापत्तीची फक्त 6 झाडे चीनमध्ये उरली आहेत. याची पाने खूप लहान व नाजूक असतात. तसेच वर्षभरात खूप कमी प्रमाणात ती मिळतात. म्हणून ही पाने खूप महाग आहेत. दा-हॉग पाओ टी च्या फक्त 10 ग्रॅम चहापत्तीसाठी चक्क 10 ते 15 लाख रुपये मोजावे लागतात.
ही चहापत्ती इतकी महाग ( Most expensive tea) असल्याने फक्त अतिश्रीमंत लोकच त्याचा चहा पिऊ शकतात. सर्वसामान्य लोकांसाठी हा चहा पिण्याचे स्वप्न तर दूरच आहे. कारण ही चहापत्ती किंवा तीच झाड बघणंही त्यांच्या नशिबात नाही.