Chandrayaan 3 । देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा! भारत बनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश

The pride of the country! India became the first country to land on the South Pole of the Moon

Chandrayaan 3 । आज देशासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. कारण आज चांद्रयान-३ चे (Chandrayaan 3) लँडिंग होणार होते. संपूर्ण जगाचे लक्ष असणारी ही मोहीम यशस्वी झाली आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला आहे. या कामगिरीचे संपूर्ण जभरातुन कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही या कामगिरीचे कौतुक केले आहे. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरलेला आहे. (Chandrayaan 3 Landing)

Chandrayaan-3 LIVE Updates । अखेर ‘चांद्रयान-3’च्या लँडिंगला सुरुवात! इस्रोने दिली सर्वात मोठी अपडेट

संपूर्ण देशभरातून चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी (Chandrayaan 3 Soft Landing) प्रार्थना केल्या जात होत्या. (Chandrayaan 3 Update) लँडिंग करण्यापूर्वीच ISRO ने (ISRO) मोठा विक्रम केला आहे. या मोहिमेचे थेट प्रक्षेपण 3.4 दशलक्ष दर्शकांचा स्पॅनिश स्ट्रीमर Ibai चा जागतिक विक्रम मोडला आहे. ISRO च्या अधिकृत YouTube चॅनेलवर 7 दशलक्षापेक्षा जास्त लोक Chandrayaan- 3 Landing पाहत आहेत. (Latest Chandrayaan News)

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का बसणार? तीन आमदार देणार सोडचिट्ठी?

दरम्यान, आता लँडिंग यशस्वी झाल्यानंतर त्यातून प्रज्ञान हा सहा पायांचा रोव्हर बाहेर येणार आहे आणि त्याला इस्त्रोकडून कमांड मिळताच तो चंद्राच्या पृष्टभागावर चालायला सुरुवात करेल. तो ५०० मीटरपर्यंत जाऊन पाणी आणि तेथील वातावरणाबाबतची सर्व माहिती इस्रोला देईल. तसेच त्याच्या चाकांवर लावण्यात आलेल्या अशोक स्तंभ आणि इस्रोच्या चिन्हाची छापही चंद्रावर सोडणार आहे.

Success Story । दुध विकून सालगडी झाला 5 एकरचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

जाणून घ्या फायदे

देशाकडे आता चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे खाजगी अंतराळ प्रक्षेपण आणि संबंधित उपग्रह-आधारित व्यवसायांमध्येही गुंतवणूक वाढवता येणार आहे. त्यामुळे देशाला आपल्या खाजगी अवकाश कंपन्यांनी पुढील दशकात जागतिक प्रक्षेपण बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा पाचपटीने वाढवाता येईल.

Shiv Sena News । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शेकडो समर्थकांसह बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

Spread the love