Maharashtra Rain | चंद्रपूर : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ (Heavy Rain in Maharashtra) घातला आहे. ठिकठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain in Maharashtra) सर्वांची तारांबळ उडत आहे. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या- नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक स्थलांतर करत आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । ब्रेकिंग! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस
एकीकडे राज्यात पावसाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे चंद्रपूर (Chandrapur) शहरात अंगावर वीज पडून तीन जणांचा बळी गेला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यामधील बेटाळा येथील गीता ढोंगे ही महिला शेतकामे आटोपून घराकडे येत असताना तिच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर कोरपणा तालुक्यातील चनई बू.येथील शेतकरी पुरुषोत्तम अशोक परचाके शेतात पिकावर फवारणी करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Heavy Rain in Chandrapur)
तर तिसरी घटना गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा या गावातील आहे. गोविंदा टेकाम हे वृक्ष लागवड करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. एकाच जिल्ह्यातील एकाच वेळी तिघांचा बळी गेल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
भीषण अपघात! देवदर्शनाला आलेल्या भाविकांची बस पलटली, दहा ते पंधरा भाविक गंभीर जखमी